विकी - कतरिनाने लग्नानंतर घेतला पहिला महत्त्वाचा निर्णय
विकी - कतरिनाच्या याच निर्णयाकडे अनेकांचं लक्ष
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलने मोठ्या थाटात जयपूरमध्ये लग्न केलं. विकी-कतरिनाच्या शाही लग्नात फक्त मोजक्याचं लोकांना आमंत्रण दिलं. लग्नाआधी दोघांनी विकी आणि कतरिनाने मित्रांना पत्र पाठवत लग्न करत असल्याची माहिती दिली. एवढंच नाही त्यांनी मित्रांना लवकरचं भेटण्याचं वचन दिलं. हे वचन आता दोघे मिळून पूर्ण करणार आहेत. यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विकी आणि कतरिना लवकरचं मित्रांना रिशेप्शन पार्टी देणार आहेत.
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्या सर्वत्र डोकं वर काढत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नानंतरचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तर दुसरीकडे विकी आणि कतरिना मात्र ग्रँड रिसेप्शनचं प्लानिंक करत आहेत.
त्यामुळे विकी-कतरिनाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये किती लोक उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विकी-कतरिनाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी कोरोना नियमांचं पालन होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विकी आणि कतरिना यांचा रिसेप्शन सोहळा 20 डिसेंबर रोजी रंगणार आहे. JW Marriott हॉटेलमध्ये रिसेप्शनची तयारी सुरू आहे. विकी-कतरिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लग्नानंतर सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दोघे शुटिंगसाठी सज्ज होणार आहेत.
विकीकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. तर कतरिना 'टायगर 3' (Tiger 3) सिनेमाच्या शुटिंगसाठी तयार होणार आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.