लग्नाच्या चर्चा होत असतानाच विकी- कतरिनाच्या वाटा वेगळ्या
विकी कौशल-कतरिना कैफ त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत.
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. अनेकवेळा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. कधी पर्ट्यांमध्ये तर कधी हॉटेलच्या बाहेर. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी एकत्र हजेरी लावली. नुकताचं त्यांना एक खास अंदाजात स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी विकी आणि कतरिना एका खास मिटिंगसाठी भेटले असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान दोघे वेगळ्या गाड्यांमध्ये आले. वेगळ्या गाड्यांमध्ये आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असताना दोघांचं वेगळ्या गाड्यामधून एकाचं ठिकाणी येणं चर्चांना वाव देत आहे. कतरिना आणि विकी लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला. पण दोघांनी अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही.
कतरिना आणि विकीने लग्नाच्या तयारीस सुरूवात केली असल्याचं देखील समोर येत आहे. दोघांनी त्यांच्या कपड्यांच्या तयारीची सुरूवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे कपडे तयार करण्याची जबाबदारी फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या खांद्यावर आहे.
एका रिपोर्टनुसार, दोघांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. दोघांचे वेडिंग आउटफिट्स डिजाइनर सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. यापूर्वी सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा ड्रेसही डिझाइन केला होता. या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघंही लग्न करू शकतात.
दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर कतरिना लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, विकी लवकरच सॅम बहादूर आणि द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटात दिसणार आहे.