नवी दिल्ली : दिल्लीच्या शास्त्री भवन येथे शुक्रवारी ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट गुजराती 'हेल्लारो' या चित्रपटाला 'सुवर्ण कमळ' जाहीर करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुरस्कारांमध्ये आयुषमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्तकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


'बधाई हो' या चित्रपटासाठी आयुषमान खुरानाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर 'उरी' चित्रपटासाठी विकी कौशलची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.



'अंधाधून' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


'उरी' चित्रपटाचे आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झाला आहे.



'महंती' या चित्रपटासाठी किर्थी सुरेशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली.


'बधाई हो' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सुरेखा सिक्रीची निवड झाली आहे.


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून 'पद्मावत' चित्रपटातील बिंते दिल' या गाण्यासाठी अरजित सिंगची निवड झाली आहे. 


सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून संजय लीला भन्साळी (पद्मावत) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.