मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहात आहेत. आता सर्वांना प्रतीक्षा आहे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 9 डिसेंबर रोजी हे कपल सप्तपदी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांच्या चाहत्यांना सध्या आपल्या आवडत्या कलाकाराबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे जोडपं आज म्हणजेच 3 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नाच्या बातम्या सध्या सर्वत्र पसरल्या आहेत. 'बॉलीवूड लाइफ' या वेबसाइटनुसार,  दोघे आज म्हणजेच 3 डिसेंबरला मुंबईत स्पेशल मॅरेज ऍक्ट, 1954 अंतर्गत लग्न करण्यासाठी तयार आहेत. 



दोघांच्या बाजूने तीन साक्षीदार असतील जे मुंबईत रजिस्ट्रारच्या उपस्थितीत विवाह घोषणा पत्रावर स्वाक्षरी करतील. लग्नाच्या तारखांबद्दल सांगायचं झालं तर, सर्व  विधी 7 डिसेंबरपासून सुरू होतील. विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला सप्तपदी घेतील. 


लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. लग्नादरम्यान कोणालाही फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास परवानगी नाही. सर्व पाहुणे 5 डिसेंबरला राजस्थानमध्ये पोहोचतील. 


कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.  दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.