मुंबई : गेल्या काही काळापासून कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना डेट करत आहेत. ज्यानंतर आता ते जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. यासगळ्या गोष्टींची लोकांमध्ये चर्चा आहे, परंतु विकी आणि कतरिना या दोघांनीही लग्नाबाबत मौन तोडलेले नाही, त्यामुळे चर्चा आणि अफवांना उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी काही महिन्यांपूर्वी कतरिना आणि विकी दोघांची एंगेजमेंट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, दोघांनीही हे या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.


विकीने पापाराझींना दोष दिला


मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या रोकाची बातमी समोर आल्यानंतर दोघेही इतके नाराज झाले की त्या जोडप्यात भांडणही झाली. हे प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले याबाबत दोघेही संभ्रमात होते. ही बातमी लीक होण्यास कोणाची टीम जबाबदार आहे यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. कारण सध्या दोघांचे प्राधान्य त्यांचे रिलिज होणारे चित्रपट आणि भविष्यातील प्रोजेक्ट आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहू इच्छित नाहीत.


विकीने अफवा पसरवल्याबद्दल पापाराझींना जबाबदार धरले आणि सांगितले की, ही बातमी तुमझ्या मित्रांनी पसरवली. योग्य वेळ आल्यावर मीही लग्न करेन, असे देखील विकी त्यांना म्हणाला.


हर्षवर्धन कपूरनेही उघडली पोल


नुकतेच एका मुलाखतीत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याला विचारण्यात आले की, तो इंडस्ट्रीतील कोणाच्या नात्याच्या बातम्या खऱ्या किंवा पीआरच्या मानतो? यावर उत्तर देताना हर्षवर्धनने विकी आणि कतरिनाला एकत्र असल्याचे सांगितले होते आणि तो म्हणाले की ही बातमी खरी आहे. त्यानंतर हे सांगताच हर्षवर्धन कपूर पुढे म्हणाला की, "हे सांगून मी अडचणीत येणार आहे का?"


हर्षवर्धनच्या उत्तरानंतर मात्र आता प्रत्येकाला जवळ-जवळ विश्वास बसला आहे की, कतरिना आणि विकी हे खरोखरचं लवकर लग्न बंधनात अडकतील.


७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न होईल


काही दिवसांपासून मीडियामध्ये अशा बातम्या येत होत्या की, विकी-कॅट याच वर्षी लग्न करणार आहेत. सवाई माधोपूरच्या चौथ, बरवारा येथील सिक्स सेन्स बारवारा फोर्ट हॉटेलमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. सर्व कार्यक्रम 7 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. यासाठी हॉटेलचे बुकिंग आधीच झाले आहे. बरं, त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे. हॉटेलनेही या व्हीआयपी लग्नाची तयारी सुरू केली आहे.


अनेक सेलिब्रिटी येतील


विकी आणि कतरिनाचा लग्नसोहळा छोटा असेल. परंतु तरीही या कार्यक्रमाला अनेक मोठे स्टार्स येण्याची शक्यता आहे. लग्नाचा मुख्य कार्यक्रम जनाना महलमध्ये होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.