मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं. लग्नात कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या काही जवळच्या लोकांनी हजेरी लावली. त्यांच्या लग्नात फोटो काढण्यास सक्त मनाई होती. त्यांमुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळणार की नाही? असा प्रश्न विकी-कतरिनाच्या चाहत्यांना उपस्थित झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 डिसेंबर रोजी विकी-कतरिना लग्न बेडीत अडकले. तेव्हा विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले. आता विकी-कतरिनाच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये दोघे प्रचंड सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. 



विकीने त्याच्या इन्स्टाग्रमावर हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत. आयुष्यातील खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत.  विकी आणि कतरिना लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत होते. अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


मोठ्या थाटात पण कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे कतरिना आणि विकीने आपल्या सर्व बॉलीवूड मित्रांना लग्नासाठी आमंत्रित केले नाही. आता या शाही लग्नाचे फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.