मुंबई : नवविवाहित कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. प्रेमाचा हा दिवस त्यांनी एकमेकांसोबत खास पद्धतीने घालवला आहे. कतरिनाने पती विकीसोबतचे हे खास क्षण इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच तिने विकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाने फोटोसोबत लिहिले आहे की, 'यावर्षी आम्हाला रोमँटिक डिनर करण्याची संधी मिळाली नसेल, पण तु प्रत्येक कठीण काळ चांगला बनवतो आणि हेच महत्त्वाचं आहे.'


कतरिनाच्या पोस्टमध्ये नमूद केलेली गोष्ट कोणापासून लपलेली नाही. लग्नानंतर काही दिवसांनी हे जोडपे आपल्या कामावर परतले. अशा परिस्थितीत कधी विकी कामानिमित्त कतरिनापासून दूर राहतो तर कधी कतरिना घराबाहेर असते.


सणाच्या दिवशी दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतात. विकी अनेक वेळा सतत प्रवास करताना दिसला. तो बऱ्याचदा मुंबई ते इंदौर आणि नंतर इंदौरहून मुंबई असा प्रवास करताना दिसतो.


त्यामुळे साहजिकच विकीने कतरिनापासून वेळ घालवण्याची कोणत्याही संधी सोडलेली नाही.



त्याचबरोबर कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कपलचे खूप सुंदर क्षण पाहायला मिळतात. एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहताना, दोघेही एकमेकांना मिठी मारताना खूप छान दिसत आहेत. विकी आपल्या पत्नीला किस करताना दिसत आहे.