या कारणामुळे विकी कौशलने कतरिनासोबत सिनेमा करायला दिला नकार
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या लग्नापासून सतत चर्चेत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या लग्नापासून सतत चर्चेत आहेत. कधी काही वैयक्तिक कारणामुळे तर कधी प्रोफेशनल कारणामुळे दोघंही लाईमलाईटचा भाग असतात. यावेळी ही जोडी कशामुळे चर्चेत आहे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
खरंतर लग्नानंतर विकी आणि कतरिनाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. दोघांनीही आपापल्या आवडीच्या स्टोरीसाठी होकार दिला आहे. पण आता विक्की कौशलने पत्नी कतरिना कैफसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास नकार दिल्याचं ऐकायला मिळतय. तुम्हाला माहित असेल की, फरहान अख्तर एका चित्रपटावर काम करत आहे ज्यामध्ये कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांना मुख्य भूमिकेसाठी साईन केलं आहे. हा चित्रपट रोड ट्रिपवर आधारित आहे
आता बातम्या येत आहेत की या चित्रपटाचा निर्माता फरहान अख्तरने विकी कौशलला या चित्रपटासाठी संपर्क साधला आहे. फरहानला विकी आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र आणायचं आहे. लग्नानंतर लाखो लोकांनाही या कपलला एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहायचं आहे. पण काही रिपोर्ट्सनुसार, विकीने या चित्रपटासाठी नकार दिला आहे. ही बातमी समोर येताच दोघांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झालीये.
एका वृत्तानुसार, या बातमीत म्हटलं आहे की, विकी या चित्रपटासाठी आधी तयार होता पण नंतर त्याला वाटलं की तो या स्टोरीतून त्याचा अभिनय दाखवू शकणार नाही. या कारणास्तव तो या चित्रपटाबद्दल कोणतेही मत बनवू शकला नाही. विकीने अद्याप या चित्रपटासाठी अधिकृतपणे नकार नं दिल्याचं बोललं जात आहे, मात्र आता तो लवकरच नकार देईल असं दिसतं आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विकी आणि कतरिना या दोघांकडे सध्या खूप काम आहे. विकी सध्या त्याच्या एका चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचं शूटिंग इंदूरमध्ये सुरू आहे, तर कतरिना सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटाचा भाग बनणार आहे.