मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देत शाही विवाहसोहळा केला. जयपूरमध्ये या जोडीचा लग्न सोहळा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्यांच्या सुखी संसाराकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दररोज विकी आणि कतरिना आपले रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसतात. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ खूपच चर्चेत असतात.


काही दिवसांपूर्वीच हे कपल मुंबई एअरपोर्टवर दिसून आलं. विकीने लग्नानंतर कामाला सुरुवात केली आहे. तो शुटींगसाठी इंदौरला गेल्याचं  बोललं जात आहे. अशाच आता विकीच्या आयुष्यात कतरिना कैफच्या आधी असलेल्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याची खूपच चर्चा होत आहे. 



विकीचा एका मुलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. या मुलीने कतरिनाच्या आधी विकीच्या आयुष्यात खास स्थान निर्माण केल्याचं बोललं जात आहे. 


हा व्हिडिओ विकीच्या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचा आहे. यावेळी ही खास व्यक्ती विकीसाठी पोहोचली होती. हा व्हिडिओ काही महिन्या आधीचा आहे.  विकीसोबत असलेली मुलगी कोण आहे अशी एकच चर्चा रंगली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ही मुलगी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आहे. ती एक अभिनेत्री आहे. पण काहींना हा चेहरा नवीन आहे. या व्हिडिओत असलेल्या मुलीचं नाव मालविका मोहन ( Malavika Mohanan ) आहे. मालविका ही विकी कौशलची बालपणीची मैत्रिण आहे. लग्नानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कतरिना-विकीच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती.


विकीसोबत अगदी क्लोज असणारी ही दुसरी तिसरी कुणी नसून त्याची जवळची मैत्रिण आहे असं कळतंय.