Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. 'मसान'मधील त्याची भूमिका असो किंवा मग आर्मी ऑफिसरची भूमिका... विकी सगळ्या भूमिका अप्रतिम पद्धतीनं साकारतो. विकी कौशलच्या अभिनयासोबत त्याच्या लूक्सची देखील नेहमीच चर्चा होते. सध्या विकी त्याचा आगामी चित्रपट छावामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी कौशलचे छावा चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. विकी कौशलचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर व्हायरल होत असलेल्या या फोटोत विकी कौशल हा योध्याच्या वेषात दिसत आहे. विकी कौशलनं धोती कुर्ता परिधान केला आहे. त्यासोबत रुद्राक्षची माळ आणि कमरपट्टा बांधला आहे. त्याशिवाय बारीक दाढीसोबत विकीचा हा लूक कोणत्याही मराठा योद्धाप्रमाणे दिसत आहे. विकी कौशलच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 



आधीचं ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. एक नेटकरी म्हणाला, विकी कौशल त्याच्या काळातील सगळ्यात चांगल्या कलाकारांपैकी एक आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, आपल्या प्रत्येक भूमिकेत स्वत: ला कसं झोकून द्यायचं हे विकी कौशलला चांगलंच माहित आहे. रिपोर्ट्सनुसार, विकीनं या चित्रपटासाठी 25 किलो वजन वाढवलं आहे. 


हेही वाचा : 'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?


दरम्यान, विकी कौशलच्या या छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत तिनं या चित्रपटाचं शूटिंग संपवल्याचं सांगित संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. . विकी कौशलनं त्याच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. विकी कौशलचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सॅम बहादूर हा चित्रपट माणिकशॉ यांच्या आयुष्यावर आधारीत होता. विकी कौशलची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे.