मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. विकी आणि कतरिना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियीावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका अवॉर्ड शोमधील आहे.  लग्नानंतर विकीचा  पहिलाच अवॉर्ड शो होता. या फंक्शनमध्ये विकी एकटाच पोहोचला पण त्याने एकट्यानेच सगळी लाइमलाइट लुटली. 


अवॉर्ड शोमध्ये विक्की कौशलची मिरवणूक काढण्यात आली. विकीच्या आयुष्यातील या खास क्षणी अभिनेत्याचे आई-वडीलही त्याच्यासोबत होते. यावेळी पुन्हा विकी आणि कतरिनाचा वरमाला कार्यक्रम रंगला. 



IIFA Awards 2022 शो मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी विक्की कौशलची मिरवणूक काढताना दिसत आहेत. 


विकीला गोल्डन हॉर्स प्रॉप देण्यात आला होता आणि समोर कतरिना कैफचे एक मोठे पोस्टर लावण्यात आलं आहे. विकी कौशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.