मुंबई : सध्या अभिनेता विकी कौशलचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. विकीचा हा व्हिडीओ 13 वर्षा जुना आहे. जेव्हा विकी अभिनयाचे धडे गिरवत होता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की तेव्हाच्या विकीमध्ये आणि आताच्या विकीमध्ये किती फरक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील विकीला ओळखणं देखील प्रचंड कठीण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण विकीचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असताना त्याच्यासोबत ती मुलगी कोण आहे? असा प्रश्न फक्त विकीच्या नाही तर अभिनेत्री कतरिना कैफच्या चाहत्यांच्या मनात देखील उपस्थित झाला असेल. 



व्हिडीओमध्ये दिसणारी ती मुलगी आजची आभिनेत्री शिरीन मिर्जा (Shireen Mirza)आहे.  हा व्हिडीओ शिरीनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


विकी कौशल आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे, हे स्थान मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्षही करावा लागला. ऍक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वर्षे विकी कामाच्या शोधात होता. 


त्यााला 'मसान'मध्ये संधी मिळाली. चित्रपटात त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. या चित्रपटात त्याचं इतकं कौतुक झालं की, त्यानंतर विक्कीला मागे वळून पाहावं लागलं नाही.