मुंबई : अभिनेता विकी कौशलचा सरदार उधम डिजिटल प्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झाला आहे. आणि हा सिनेमा ट्रेंडिंगवर आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून विकी कौशलचं खूप कौतुक होत आहे. सुजित सिरकर यांनी दिग्दर्शित केलेला हा क्रांतिकारी सिनेमा भारताच्या स्वातंत्र्य युगावर आधारित आहे. रोनी लाहिरी आणि शील कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. उधम सिंह यांनी डायर यांची इंग्लंडला जाऊन हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांनी घेतलेल्या बदल्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. आता विकीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरदार उधम सिनेमाच्या सेटवर गंभीर दुखापत?
ही भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलला बरेच बदल करावे लागले. त्याने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यात तो त्याच्या तयारीची झलक देताना दिसत आहे. त्याने त्याच्या पाठीवरचे कट दाखवले आहेत. या फोटोत तो जखमी अवस्थेत दिसत आहे. आरशामध्ये, त्याची एक झलकही आपल्याला पहायला मिळते. त्याच्या चेहराही जखमी अवस्थेत दिसत आहे. हा फोटो सिनेमाच्या शूटदरम्यान काढला आहे
 
या फोटोसोबत विकीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “Cuts that didn’t make the cut #SardarUdham” अभिनेत्याने अलीकडेच दिग्दर्शकासाठी एक पोस्टही शेअर केली आहे आणि चित्रपटासाठी त्याचे आभार मानले आहेत. शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. 



याआधी विकीने सांगितला होता हा किस्सा
विक्की कौशलने ट्रेलर लाँचमध्ये सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. पण 4 दिवसांपूर्वी काही अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले. जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हे कळलं तेव्हा ते हसले आणि म्हणाले की, तु आहेस तसाच ये आपण तु आहेस तसच शूट करु. आणि म्हणून हे शूट पार पडलं. 4 दिवसांनंतर, विकी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि आहे त्या अवस्थेत त्याने शूट पूर्ण केलं.