मुंबई : बी टाऊनमध्ये अनेकदा कलाकारांच्या रिलेशनशिपची चर्चा होत असते. अनेकदा नवनवी जोडी प्रेक्षकांच्या समोर येत असते. अशीच एक जोडी सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ. विक्की कौशल आणि कतरिना कैफ दोघं अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झालेत. (Vicky Kaushal spotted leaving rumoured girlfriend Katrina Kaif residence : Video ) मात्र आता जो व्हीडिओ समोर आलाय तो पाहून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. अभिनेता विक्की कौशल थेट कतरिना कैफच्या घरात असल्याचा हा व्हीडिओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हीडिओ ईटाईम्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यामध्ये विक्की कौशल सोमवारी दुपारी कतरीना कैफच्या घरी पोहोचला होता. ईटाइम्सच्या फोटोग्राफरने विक्की कौशल आल्यानंतर काही वेळाने त्यांची कार कतरिना कैफच्या घराबाहेर निघताना पाहिली. 



'द कपिल शर्मा' शो मध्ये "सूर्यवंशी' सिनेमाच्या प्रमोशन करता टीम आली होती. यावेळी निर्माता करण जोहरने कतरिना कैफला विक्की कौशलच्या नावाने चिढवलं होतं. करण जोहरने कतरिना विचारलं की,'देखिए इनके घर में सब कौशल मंगल है।'



कामाबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफ 'टायगर 3' मध्ये सलमान सोबत आणि 'सूर्यवंशी'मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर विकी कौशल फिल्म 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' मध्ये सारा अली खानसोबत दिसणार आहे. या सिनेमासोबतच सरदार उधम सिंह आणि फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.