Vicky Kaushal on Katrina Kaif's First Karva Chauth : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' या बहुप्रतिक्षीत चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ज्यापैकी एकात विकी कौशलचे डान्स मूव्हजनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे, तर दुसऱ्या गाण्यात त्याच्यातील आणि तृप्ती डिमरीच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांची लक्ष वेधलं आहे. या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या विकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना कैफविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना आणि विकी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि ग्लॅमरस कपल्सपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही त्यांची जोडी ही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तर विकीनं लग्नाच्या तीन वर्षांनंतर फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पत्नीविषयी एक मजेशीर खुलासा केला आहे. त्यानं कतरिनाला 'गूगल क्वीन' चा टॅग दिला आहे. त्या मागचं कारण काय हे देखील त्यानं सांगितलं आहे. विकीनं सांगितलं की 'करवाचौथच्या दिवशी कतरिनानं गूगलला विचारलं होतं की चंद्र कधी दिसेल. तर तिच्या प्रश्नावर गुगलनं उत्तर दिलं होतं की रात्री 8: 30 वाजता चंद्र दिसेल.' 



याविषयी सांगत विकी पुढे म्हणाला, 'मी तिला सांगितलं की चंद्र गूगलचं म्हणणं ऐकणार नाही. तो तेव्हाच येईल जेव्हा त्याला यायचं असेल. गूगल ढगांची मूव्हमेंट्स असतात त्यांच्याविषयी भाकित करू शकत नाही. चंद्र यायला उशिर झाला कतरिनाचा संयम हळू हळू संपत होता. तेव्हा मी तिला सांगितलं की मी म्हणालो होतो ना की चंद्र तेव्हाच येईल जेव्हा त्याची इच्छा असेल.' 


विकीनं पुढे सांगितलं की '8:30 वाजेपर्यंत कतरिना काही बोलली नाही. पण जेव्हा गुगलं सांगितलं की 8:30 वाजलेत, तेव्हा कतरिना लगेच म्हणाली मला खूप भूक लागलीये.' तर कतरिनानं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या करवा चौथच्या अनुभवाविषयी सांगितलं होतं, त्यावेळी ती म्हणाली की 'माझ्यासाठी ते कठीण नव्हतं कारण एक अभिनेत्री असल्यानं आम्हाला अनेकदा वेगवेगळ्या डायटिंग पाळाव्या लागतात, अशात त्याचा थोडा फायदा झाला. मात्र, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे विकीनं देखील माझ्यासोबत उपवास ठेवला होता.' 


हेही वाचा : 'प्लीज अल्लाह...', ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या भयानक त्रासाला कंटाळलेल्या हिना खानची भावूक पोस्ट


दरम्यान, विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे कलाकार दिसणार आहेत.