Vicky Kaushal – Katrina Kaif wedding: असा रंगला दोघांचा प्रेमाचा प्रवास, वाचा complete timeline
असा आहे विकी कौशल आणि कतरिना कैफच्या प्रेमाचा प्रवास
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांचा रोका झाला. आता लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकरणार आहेत. पण हे दोघं एकमेकांच्या कधी प्रेमात पडले किंवा या दोघांनी आपल्या नात्याची कबुली कधी दिली. याचा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे जाणून घेऊया या दोघांच्या प्रेमाची Complete Timeline...
दोघं एक झाले
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ दोघं लवकरच एकमेकांचे होणार आहेत. लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. पण हा प्रेमाचा प्रवास नक्की कधी सुरू झाला हे सगळ्यांसाठी उत्सुकतेचं आहे. त्यामुळे पाहूया लव्हस्टोरी..
या प्रेमाला नक्की कधी सुरूवात झाली
याची सुरूवात (Koffee with Karan) कॉफी विथ करण या कार्यक्रमापासून झाली. जेव्हा कतरिनाने या कार्यक्रमात आपल्याला विकी कौशलसोबत काम करायची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून विकी अतिशय हुरळून गेला. त्याला कतरिनाच्या या इच्छेचा खूप आनंद झाला.
'मुझसे शादी करोगे' क्षण
2019 मध्ये झी सिने अवॉर्ड्समध्ये, जेव्हा कतरिनाने त्याच्या उरो युद्धाच्या प्रतिसाद दिला, ती म्हणाली ‘कसा आहे जोश?’ ‘How’s the josh?’ विकीने बॉलिवूडचे प्रसिद्ध हिट गाणे 'मुझसे शादी करोगी' गाऊन कतरिनाला अप्रत्यक्षपणे लग्नाकरता प्रपोझ केलं आहे.
दोघं एकत्र दिसले
यानंतर कतरिना कैफ आणि विकी कौश अनेकदा कार्यक्रमात एकत्र दिसले. एवढंच नव्हे तर ते दोघं अनेकदा खासगी रित्यादेखील एकत्र दिसले. यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.
हर्षवर्धन कपूरने केला खुलासा
हर्षवर्धन कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत, कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर कतरिना त्याच्यावर रागवली असल्याची देखील चर्चा होती.
2021 मध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन
2021 मध्ये अधिकृत नाही पण या दोघांनी रिंग शेअर केली. कतरिनाने एक पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केला होता. ज्यामध्ये तिने एका व्यक्तीला हग केलं होतं. पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातलेली ती व्यक्ती विकी कौशल असल्याचा दावा चाहत्यांनी केला होता.
सोशल मीडियावर शुभेच्छा
कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांना वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर शुभेच्छा देतात.
रोका
रिपोर्टनुसार, कतरिना कैफने फिल्ममेकर कबिर खानच्या घरी अगदी खासगी पद्धतीने रोका ही विधी करून घेतल्याचं कळलं.