मुंबई : नॅशनल क्रश दिशा पटानी सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे, सध्या अभिनेत्री आणि बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच दिशाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री शिमरी लेहेंगामध्ये जबरदस्त पोज देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वधूप्रमाणे दिशा लेहेंग्यामध्ये किलर स्टाईलमध्ये दिसत आहे, तर ऑफ शोल्डर ब्लाउजसह, अभिनेत्रीने या लूकला बोल्डनेसचा स्पर्श जोडला आहे.


दिशा पटानी अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसणार्‍या दिशाने पारंपारिक लूकसोबतच ग्लॅमरही जोडलं आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते तिच्या या व्हिडिओवर अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्याची अटकळ बांधत आहेत. तर काही चाहते तिला अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं आहे का असा प्रश्नही विचारताना दिसत आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, दिशाचा हा व्हिडिओ तिचा लग्नाचा नसून तिच्या फोटोशूट दरम्यानचा आहे. ज्यामध्ये ती वधूच्या वेशात दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच अभिनेत्रीचा 'एक व्हिलन रिटर्न्स'  हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपची बातमी फिल्म कॉरिडॉरमध्ये आहे. यावर स्टार्सनी अद्यापरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.