VIDEO : Bigg Boss च्या घरी आज `हा` दिसणार स्विम सूटमध्ये
बिग बॉस सिझन ११ च्या घरी आज भरभरून हसायला मिळणार आहे.
मुंबई : बिग बॉस सिझन ११ च्या घरी आज भरभरून हसायला मिळणार आहे.
कालच्या एपिसोडमध्ये लव त्यागीने महिला होऊन सर्वांनाच भरपूर हसवलं. रोबोट हिना झाला असून प्रियांक, आकाश आणि हितेनला हसवण्याचा प्रयत्न हिट झाला आहे. लोकांना लवचा हा अंदाज अतिशय आवडला. मात्र आजची परिस्थिती वेगळी असणार आहे. शिल्पा, विकास, अर्शी आणि लव रोबोट होणार असून तर त्यांना हसवण्याचा प्रयत्न करणार आहे.
हिना, प्रियांक, आकाश आणि हितेन. यासाठी हितेन आणि प्रियांक हे दोघेही हटके लूकमध्ये दिसणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये हितेन तेजवानी अर्शीचा ड्रेस घालून महिला साकारणार आहे तर प्रियांक आपल्याला स्विम सूटमध्ये दिसणार आहे.
या आठवड्यात बिग बॉसने घरातील मंडळींना बीबी लॅबचा टास्क दिला आहे. या टास्कमध्ये मंगळवारी हितेन, हिना, आकाश आणि प्रियांक रोबोट होणार आणि पुनीश या लॅबचा साइंटिस्ट आहे. तिथेच विकास, लव, अर्शी आणि शिल्पा लॅबमध्ये काम करणारे वर्कर्स आहे. या लोकांना बिग बॉसच्या म्हणण्यानुसार रोबोटला हसवायचं आहे आणि रडवायचं आहे. मात्र आजच्या एपिसोडमध्ये सगळं वेगळं झालं आहे. शिल्पा विकास अर्शी आणि लव हे रोबोट होणार आहे.
आजच्या टास्कमध्ये महिला झालेला हितेश रोबोट बनलेल्या सदस्यांना हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र बिग बॉसद्वारे शेअर केलेल्या या व्हिडिओत सगळे प्रयत्न रोबोट झालेल्या सदस्यांना हसवणार आहे. बघा महिला झालेल्या या हितेनचा अंदाज