मुंबई : बुधवारचा दिवस गाजवला तो बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'अराजकीय' मुलाखतीनं... या मुलाखतीत पंतप्रधानांनी आपल्या आयुष्यातल्या  खाजगी गोष्टींवरही अक्षयसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशभरात मतदान आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधांनांची ही मुलाखत वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहिली. पण, एखाद्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीची एका सिने इंडस्ट्रीतील व्यक्तीनं घेतलेली ही काही पहिलीच मुलाखत नाही बरं का... याआधाही अभिनेत्री-सिनेनिर्माती सिमी गरेवाल यांना ही संधी मिळाली होती. सिमी गरेवाल यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत दूरदर्शन या वाहिनीवरून प्रसारितही करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


'भारत के राजीव' या नावानं ही तीन भागांची सीरिज हिंदी आणि इंग्रीज भाषेतून तयार करण्यात आली होती. यासाठी पुढाकार सिमी गरेवाल यांनीच घेतला होता. या व्हिडिओमध्ये राजीव गांधी यांच्या मुलाखतीसोबतच त्यांच्या आयुष्यातील विविध पैलुंविषयी भाष्य करणाऱ्या डॉक्युमेंटरीचाही समावेश आहे.  



 


मुलाखत आणि डॉक्युमेटरी असं स्वरुप असलेल्या 'भारत के राजीव' या सीरिजचे तीनही भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत.  



अभिनेते राज कपूर यांच्यासोबत 'मेरा नाम जोकर'मध्ये दिसलेल्या अभिनेत्री सिमी गरेवाल या 'कर्ज', 'सिद्धार्थ', 'द बर्निंग ट्रेन' या सिनेमांतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. सिमी गरेवाल यांना सिनेमांपेक्षा त्यांच्या 'रेनदे विद सिमी' या टॉक शोसाठीही ओळखलं जातं.