मुंबई : सध्याच्या घडीला संपूर्ण बी- टाऊन अर्थात बॉलिवूडमध्ये एकाच जोडीची चर्चा सुरु आहे. त्यांच्या प्रेमाचेच वारे सर्वत्र वाहत आहेत. पुरस्कार सोहळा म्हणू नका किंवा एखादी पार्टी, ही जोडी एकत्र दिसली की चर्चांना सुरुवात झालीच म्हणून समजा. बी- टाऊनची ही बहुचर्चित जोडी ठरत आहे, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिची. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर आलियाने त्यांच्या प्रेमाची ग्वाहीच जणू दिली आहे. अशातच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी सिने अवॉर्ड्स' या पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ असून, आलिया आणि रणबीरचा अनोखा अंदाज आणि त्यांच्या काहीशा गोंधळलेल्या किसचा किस्सा प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक फॅनपेजवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 'राझी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलियाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 


आलियाला अभिनंदन करण्याच्या अनुषंगाने रणबीर तिच्याकडे वळला खरा, पण त्यांच्यातील हा गोड गोंधळ त्याक्षणी अनेकांचं लक्ष वेधून गेला. अर्थात दोघांच्याही ती बाब लक्षात आल्यावर हलकंसं स्मितहास्त देत त्यांनी प्रसंग सावरून नेण्याचा प्रयत्न केला. रणबीर आणि आलियाची ही क्यूट केमिस्ट्री सध्याच्या घडीला एक बहुचर्चित विषय ठरत आहे. 



फक्त 'झी सिने अवॉर्ड्स'च नव्हे, तर 'फिल्मफेअर' पुरस्कार सोहळ्यातही आलियाने जाहीरपणे रणबीरवरील प्रेम व्यक्त केलं होतं. त्यामुळे 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...' हाच मूलमंत्र या दोघांनी अवलंबला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ही जोडी येत्या काळात 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून एकत्र झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटातून आलिया आणि रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहचा येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक परवणी असणार आहे.