मुंबई : अभिनेता रणवीर सिंग अर्थातच आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे... नुकताच तो इटलीलाही रवाना झालाय. पण, इटलीला रवाना होण्याच्या अगोदर रणवीरनं मराठमोळ्या 'बंड्या'साठी एक खास मॅसेज दिलाय. हा मॅसेज पोहचवलाय 'सिंबा'चा रणवीरचा सहअभिनेता सिद्धार्थ जाधवनं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेक जणींना होत असेल... पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा? 


आपली 'गुलाबीच कळी' अर्थातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती आहे. तेजस्विनीचा मित्र अभिनेता सिद्धार्थ जाधवला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सिंबाच्या सेटवरून सिद्धार्थनं त्याची 'बंड्या' अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचं सरप्राइज गिफ्ट दिलं. या मेसेजमध्ये रणवीरने चक्क तिला भेटायची इच्छा व्यक्त केलीय.


सिंबाच्या सेटवर सहज गप्पांच्या ओघात सिद्धार्थनं रणवीरला तेजस्वीनी त्याची प्रचंड मोठी फॅन असल्याचं सांगितलं. रणवीरनं तेजस्विनी अधिक माहिती मिळवल्यानंतर त्याला तेजस्विनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'सिंधुताई सकपाळ' चित्रपटाची नायिका असल्याचं समजलं... आणि मग त्याने लगेचच सिद्धार्थकरवी तेजस्विनीला व्हिडिओ पाठवून तेजस्विनीला भेटायची इच्छा व्यक्त केली. 


अर्थातच रणवीरच्या या मॅसेजनं तेजस्विनीची दिवाळी आणखीनच खास झाली.