व्हिडिओ : बीग बींचा फोटो पाहताच रेखा यांची अशी होती प्रतिक्रिया...
रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता
मुंबई : एव्हरग्रीन बॉलिवूड अभिनेत्री रेखा या नुकत्याच बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडर २०१९ लॉन्चिंग सोहळ्यात दाखल झाल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या कार्यक्रमात दिसत आल्यात. यावर्षीही रेखा यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली... यावेळी चर्चेत राहिला त्यांची त्यांची ड्रेसिंग स्टाईल आणि बीग बी अमिताभ यांच्या फोटोकडे पाहून घाईघाईनं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया... रेखा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.
डब्बू रत्नानी आणि त्याच्या मुलांसोबत पोझ देत रेखा पत्रकारांसमोर उभ्या होत्या... त्यानंतर पत्रकारांनी त्यांना एकटं उभं राहत फोटो काढण्याची विनंती केली... यावेळी रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता... अर्थात रेखा यांनी याच ठिकाणी उभं राहून पोझ दिली असती तरी ते फोटो व्हायरल झाले असते... पण, मागे बीग बींचा फोटो आहे हे लक्षात येताच चर्चा टाळण्यासाठी रेखा त्या जागेवरून बाजुला सरकल्या... यावेळची रेखा यांनी घाईघाईनं दिलेली प्रतिक्रियाही सोशल मीडियावर चर्चेसाठी पुरेशी ठरली.
रेखा यांचा आकर्षक लूक
डब्बू रत्नानी कॅलेंडर लॉन्चिंग कार्यक्रमात रेखा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि त्यावर अगदी चपखल सूट होतील अशा शूजमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी रेखा अभिनेत्री विद्या बालन हिच्यासोबत मनमोकळेपणानं हसता-बोलतानाही दिसल्या. दोघींनी पत्रकारांसमोर सोबत पोझही दिल्या.