मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ तीन तरूणींनी केलेल्या धमाकेदार डान्सची प्रेक्षकांकडून प्रशंसा केली जात आहे. २ महिन्यात हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज टॅलेन्टला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. त्याचाच हा एक भाग आहे.  



नुकत्याच येऊन गेलेल्या ‘बादशाहो’ सिनेमातील ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ गाण्यावर या व्हिडिओतील तरूणी डान्स करत आहेत. हे गाणं सिनेमात सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आलं होतं. त्यामुळे हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. नंतर अनेकांनी या गाण्यावर डान्स करून ते व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले होते. या तरूणींचा व्हिडिओ आतापर्यंत ११ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय.