मुंबई : आपल्या आयटम साँन्गने टीव्हीपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावणारी राखी सावंत आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाइल आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. राखी सध्या बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. त्यामुळे कदाचित दोघंही लवकरच लग्नाची घोषणा करतील असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. दरम्यान, राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, 'हीरो ..हिरोईन आणि खलनायक ..व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपेटलेलं प्रेम'. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आदिलसोबत राखीला घेऊन जाताना दिसत आहे. ज्याने राखीला पावसापासून वाचवण्यासाठी छत्रीही धरलेली दिसत आहे. दरम्यान, व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना राखी म्हणते, 'मी हे पाहिलं आहे..तीन तिगडा काम बिघडा..हीरो, हिरोईन आणि व्हिलन'.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडिओमध्ये राखी तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसत आहे. आणि हा व्यक्ती तिला तिथे घेऊन जात आहे. लूकबद्दल बोलायचं तर राखीने ऑफ व्हाइट कलरचा ब्लेझर आणि स्कीनी फिट पँन्ट घातली आहे. त्याचबरोबर आदिल फुल स्लीव्हचा पांढरा स्वेट शर्ट आणि जीन्स घातलेला दिसत आहे. एक मिनिट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राखीच्या चाहत्यांनाही प्रश्न पडला होता की, ही व्यक्ती कोण आहे? पण नंतर हे स्पष्ट झालं की,  हा एक मजेदार कॉमिक व्हिडिओ आहे.