मुंबई : एक चतुरस्त्र अभिनेता, अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आर. माधवन यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे. दरवेळी नव्या भूमिकांना न्याय देणाऱ्या माधवननं आता म्हणजे देश सोडला आहे. तो आता थेट दुबईला पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलासाठी म्हणून हा अभिनेता आणि त्याचं कुटुंब परदेशात गेलं आहे. पण, इथं मात्र त्याची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. 


कारण, ठरतोय तो म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. R. Madhavan सध्या त्याच्या Decoupled या नेटफ्लिकवरील सीरिजमुळं बराच चर्चेत आला आहे. 


याच सीरिजमधील एक व्हिडीओ सध्या तुफान गाजतोय. इथं माधवनचा अभिनय पाहून चाहतेसुद्धा त्याला उत्सफूर्त दाद देऊ लागले आहेत. 


व्हिडीओमध्ये माधवन विमानतळावर असणाऱ्या प्रार्थना खोलीमध्ये येतो. पाठीत दुखत असल्यामुळं तो इथं स्ट्रेचिंग व्यायाम करताना दिसतो. 


त्याच्याच बाजुला तिथे एक व्यक्ती नमाज अदा करताना दिसतात. त्यांना कोणताही व्यत्यय येणार नाही हे माधवन लक्षात घेतो. 


पण, तो प्रार्थनेच्या खोलीत व्यायाम प्रकार करत असल्याचं पाहून याच नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीकडून माधवनला रोखलं जातं. 



एअरपोर्टवर काम करणारी व्यक्तीही त्याला रोखू पाहते. तिथेच मग तो व्यायाम करता करता गायत्री मंत्राचं पठण करताना दिसतो. 


म्हणजेच व्यायामही आणि प्रार्थनाही. आर. माधवनच्या अभिनयाची ही झलक सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून जाते.