मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड  सुरु आहे. पी.व्ही सिंधू, सायना नेहवाल, कपिल देव, अभिनव बिंद्रा बरोबरचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अजून एका राजकीय नेत्यावरील चित्रपटाचे काम लवकरच सुरु होणार आहे. अभिनेत्री विद्या बालन आणि तिचा नवरा निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तकाचे अधिकार विकत घेतले आहेत.


पत्रकार सागरिका घोष यांनी इंदिरा गांधी यांच्यावर लिहिलेल्या ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाचे अधिकार विद्याने विकत घेतले आहेत. विद्या बालनचं या सिनेमाच इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय.