धक्कादायक : विद्या बालनला दिग्दर्शकाने रुममध्ये एकट्यात बोलावलं; पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का
चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचबाबत अनेकदा काही कलाकार मोठे खुलासे करतात. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचं नाव `या` यादीत जोडलं गेलं आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (VIdya Balan) आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय, डान्स (Dance), सिनेमे (Movies) इत्यादी गोष्टींमुळे ती कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय (Active) असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत नवनवीन व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) शेअर करत असते. ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. विद्या बालनने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण एकेकाळी तिलाही अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते.
चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचबाबत अनेकदा काही कलाकार मोठे खुलासे करतात. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचं नाव या यादीत जोडलं गेलं जेव्हा तिने अलीकडेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीतत कास्टिंग कशी स्वत:ची सुटका केली याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या बालनने सांगितलं की, एका दिग्दर्शकाने तिला एका खोलीत एकटीला भेटण्यासाठी बोलावलं होतं, मात्र तिने हुशारी दाखवून स्वत:ला वाचवलं. त्यामुळे हा चित्रपट तिच्या हातातून गेला, पण कास्टिंग काउचची शिकार होण्यापासून वाचल्याचा आनंद विद्याला आहे.
मुलाखतीत विद्या बालन म्हणाली, 'मी कधीच कास्टिंग काउचचा सामना केला नाही, ज्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी अनेक भयकथा ऐकल्या होत्या. जेव्हा मी फिल्म लाइनमध्ये येत होते तेव्हा माझ्या आई-वडिलांना हीच सर्वात मोठी भीती होती. म्हणूनच त्या लोकांना मी चित्रपटात दिसावं असं वाटत नव्हतं. पण माझ्यासोबत एक घटना घडली. मला आठवते की मी एक चित्रपट साइन केला होता आणि मला दिग्दर्शकाला भेटायचं होते. त्यादरम्यान मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला जात होते.
दिग्दर्शकाने खोलीत एकट्याला बोलावलं
विद्या पुढे म्हणाली, 'दिग्दर्शकाने मला सांगितलं की, जेव्हा तू चेन्नईला येशील तेव्हा भेटू. मी सांगितले की, मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला येणार आहे, मग तेव्हाच भेटू. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो, पण तो दिग्दर्शक माझ्यावर त्याच्या खोलीत जाऊन बोलण्यासाठी वारंवार दबाव आणत होता. त्यावेळी मला काही समजू शकलं नाही कारण तेव्हा मी एकटीच होते. पण मी हुशारी दाखवली. त्याच्या खोलीत पोहोचल्यावर मी दार उघडंच ठेवलं. कदाचित त्याला समजलं असेल की, त्याच्यासाठी एकच मार्ग आहे.'' या घटनेनंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.