प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने Vidya Balan ला केलं होतं अपमानीत, काय आहे संपुर्ण प्रकरण
बापरे! इंडस्ट्रीत नवीन असलेल्या Vidya Balan चा झाला होता अपमान, चित्रपट निर्मात्याने वापरले होते अपशब्द?
Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (VIdya Balan) आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय, डान्स (Dance), सिनेमे (Movies) इत्यादी गोष्टींमुळे ती कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय (Active) असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत नवनवीन व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) शेअर करत असते. ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. विद्या बालनने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण एकेकाळी तिलाही अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालनच्या करिअरविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. (Vidya Balan was humiliated by a famous filmmaker what is the whole case nz)
विद्या बालन बिगर फिल्मी पार्श्वभूमीची
विद्या बालन नॉन फिल्मी पार्श्वभूमीची (Non Filmy Background) आहे. विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात 'ला बैला' या टीव्ही शोमधून केली होती. तोच शो काही महिन्यांतच बंद झाला. विद्या बालनचा हा शो बंद झाल्यानंतर तिचे कुटुंबीय खूप खुश होते. विद्या बालन आता चित्रपटात काम करण्याचे स्वप्न सोडून देईल, असे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते. तिने चित्रपटात काम करु नये अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छ होती.
जाणून घ्या अनुराग बसूची ऑफर का नाकारली
एकेकाळी अनुराग बसूने (Anurag Basu) विद्या बालनला टीव्ही शोची (TV show) ऑफर (Offer) दिली होती पण अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली. तिला चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवायचे होते. याच कारणामुळे तिने अनुराग बसूने दिलेली ऑफर नाकारली. विद्या बालनला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 'चक्रम' या मल्याळम चित्रपटात पहिल्यांदा भूमिकेची ऑफर आली होती. हा चित्रपट बनवताना काहीतरी चूक झाली ज्यामुळे चित्रपट स्थगित करण्यात आला. त्याचवेळी या चित्रपटाच्या निर्मात्याने विद्या बालनला नीच म्हणत या चित्रपटातून काढून टाकले होते.
तामिळ चित्रपटात काम करण्याची संधी
मल्याळम चित्रपटाच्या वाईट अनुभवानंतर विद्या बालनने हार मानली नाही आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला 'रन' या तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर तामिळ चित्रपटातही अभिनेत्रीला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता.
बंगाली चित्रपटातून ओळख
2003 सालाबद्दल बोलायचे तर, याच वर्षी विद्या बालनने 'भलो थेको' या बंगाली चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटातील तिचा दमदार अभिनय पाहिल्यानंतर अभिनेत्रीला बॉलिवूडमधूनही काम मिळू लागले.