मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन स्टारर चित्रपट 'शेरनी' काहि दिवसांपूर्वी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. याशिवाय शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज कबी हे देखील चित्रपटात दिसले होते. 'शेरनी' चित्रपटात विद्या एक प्रामाणिक वन अधिकारी आहे, वन अधिकारी आपल्या क्षेत्रातील जंगलाचं संरक्षण आणि सर्वेक्षण करण्याचं काम करतो. पण तुम्हाला माहिती आहे का विद्या बालन खऱ्या आयुष्यात किती शिकलेली आहे आणि तिने कुठून शिक्षण घेतलं आहे? जर तुम्हाला माहित नसेल तर काही फरक पडत नाही, आज आम्ही तुम्हाला या बद्दलच सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँथनी गर्ल्स हायस्कूल, मुंबई येथे शिक्षण घेतलं
विद्या बालनचा जन्म 01 जानेवारी 1978 रोजी पुथूर, पलक्कड, केरळ येथे झाला, परंतु तिचं बालपण मुंबईच्या माया नगरीत गेलं. तिनं तिचं प्रारंभिक शिक्षण सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल, चेंबूर, मुंबई येथे केलं.


शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा दास शाळेत एकत्र आहेत
विद्या बालन एकमेव अभिनेत्री नाही जिने या शाळेतून आपलं शालेय शिक्षण घेतलं आहे. शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा दास यांनी देखील या शाळेतून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे.



समाजशास्त्रात मास्टर्स
त्यानंतर विद्याने सेंट झेवियर्स कॉलेज आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. शाळेत असतानाही त्यांना अभिनयाची खूप आवड होती.


कॉमेडी टीव्ही शो 'हम पाच' ने ही भूमिका केली
महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडलं आणि मल्याळम इंडस्ट्रीत प्रवेश केला. मल्याळम चित्रपट चक्रम हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला असता पण काही कारणामुळे शूटिंग झालं नाही. 1995 मध्ये तिने टेलिव्हिजन कॉमेडी शो 'हम पाच'मध्ये 5 व्या मुलीची भूमिका साकारवी होती. मात्र, यानंतरही, तिने बराच काळ संघर्ष केला आणि जाहिरात चित्रपट आणि गाण्याच्या व्हिडिओंमध्ये काम करणं सुरू ठेवलं.