मुंबई : ऍक्शन हिरो विद्यूत जामवाल कायम सोशल मीडियावर प्रोफेशनल लाईफबद्दल अपडेट देत असतो. शिवाय आगामी चित्रपटांचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असतो. पण आता तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे विद्यूतच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विद्यूतने जानेवारी महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर केला. तेव्हा कळालं ज्या विद्यूतने चाहत्यांच्या मनात राज्य केलं त्याच्या मनात एका खास व्यक्तीने घर केल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यूत ज्या फॅशन डिझायनरला डेट करत आहे, तिचं  आणि अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत नात आहे. फॅशन डिझायनर नंदिता माहतानीला विद्यूत डेट करत आहेत. नंदिताचे सोशल मीडियावर अनेक फोटो आहेत. त्यामध्ये अनेक फोटो विद्यूतचे देखील आहेत. नंदिताने काही फोटो  शेअर करत कॅप्शनमध्ये इंद्रधनुष्याचं इमेजी पोस्ट केलं आहे. 



या फोटोवरून तिने विद्यूतसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची  हिंट दिली आहे. तिच्यावर माहीप कपूर, सीमा खान,  भावना पांडे, रोहिणी अय्यर, सोफी चौधरीसह अनेकांनी नंदिताच्या पोस्टवर कमेन्ट केली आहे. पण विद्यूत आणि नंदिताने त्यांच्या नात्यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही.  पण सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो आहेत.



काही दिवसांपूर्वी नंदिताने विद्यूतला त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 'शुभेच्छा.. V! यश, प्रेम आणि गुडलक तुला आणि तुझ्या टिमला...' यावर विद्यूतने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'धन्यवाद नंदू बेबी..'


नंदिताचं करिष्मासोबत काय आहे नात?
नंदिता एक फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींचे कपडे डिझाईन केले आहेत. नंदिता माहतानी संजय कपूरची पहिली पत्नी आहे. नंदितापासून विभक्त झाल्यानंतर संजयने करिष्मा कपूरसोबत लग्न केलं. पण त्यांचं नात देखील जास्त काळ टिकलं नाही.