मुंबई : 'कमांडो' आणि 'फोर्स' फेम अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या आगामी 'जंगली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी 'जंगली' चित्रपटाचा टिझर लॉन्च करण्यात आला होता. आता 'जंगली'चा ट्रेलर आणि एक पोस्टरही लॉन्च करण्यात आलं आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले संपूर्ण अॅक्शन सिक्वेन्स विद्युतने स्वत: परफॉर्म केले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरून 'जंगली'चं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. 'जंगली'चा ट्रेलर ऑनलाईन रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये विद्युत अतिशय वाइल्ड अंदाजात दिसत आहे. येत्या ५ एप्रिलला 'जंगली' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ट्रेलरमध्ये विद्युतची जनावरांसोबत घनिष्ट मैत्री असल्याचं दिसतंय. विद्युत आपल्या जीवाची पर्वा न करता जंगल वाचवण्याची धडपड करतो. 'जंगली'मध्ये विद्युत अनेक अॅक्शन सीन्स करताना दिसतोय. 'जंगली'चा ट्रेलर बघताना 'जंगल बुक' चित्रपटाचीही आठवण होते. ट्रेलरच्या सुरूवातीलाच राजेश खन्ना यांच्या हाथी मेरे साथी चित्रपटाची झलकही पाहायला मिळते.



चित्रपटात विद्युतसह सथ आशा आणि पूजा सावंत यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहे. चक रसल दिग्दर्शित 'जंगली'मध्ये अॅक्शनसह वाइल्डलाइफही अतिशय आकर्षकपणे मांडण्यात आलं आहे.