मुंबई : काही साहसी दृश्य साकारत प्रेक्षकांना पडद्यासमोरच खिळवून ठेवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता विद्युत जामवाल याच्या नावाचा समावेश होतो. विद्युत जी साहसी दृश्य साकारतो, ज्यामध्ये तो ज्या ताकदीनं आपली किमया दाखवतो ते पाहता हे सर्व आपल्याला अशक्यच.... अशीच प्रतिक्रिया अनेकजण देतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, तुम्हाला माहितीये का विद्युतप्रमाणंच आणखी एक व्यक्तीही आहे ज्याच्या स्टंटनं, त्याच्या साहसानं सर्वांनाच अवाक् केलं आहे. 


एका ओंडक्यावर तोल सावरणं असो किंवा दोरखंडाचा आधार घेत वरच्या दिशेनं चढाई करणं असो. 


पाहताक्षणी कठीण वाटणारी अनेक कामं अगदी सजहपणे करणारा हा व्यक्ती आहे अनमोल चौधरी. 


सोशल मीडियावर अनमोलनं असे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 


बायोमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार तो भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे हजारोंच्या संख्येनं फॉलोअर्स आहेत. ज्या माध्यमातून तो अनेकांनाच प्रेरणा देत आहे. 


दोन बोटांच्या आधारावर पुशअप्स मारण्यापासून अतिशय वेगळ्या पद्धतीनं घोड्यावर स्वार होण्यापर्यंतचे अजब प्रकार त्यानं त्याच्या अकाऊंटवरून सर्वांच्या भेटीला आणले आहेत. 


अनमोलनं त्याच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. इतकंच नव्हे, तर बळाचा वापर योग्य त्या ठिकाणी करण्याला त्यानं प्राधान्य दिलं आहे. 




अभिनेता विद्युत जामवाल यानंही त्याच्या या कौशल्याची दखल घेत त्याच्यापासून प्रेरणाही घेतल्याचं म्हटलं जात आहे.