मुंबई : विद्युत जामवालची लव्ह लाईफ अजून लोकांसमोर आली नव्हती. लोकांनी त्याच्या मैत्रिणीला क्वचितच पाहिले, पण आता विद्युतने सर्वांसमोर आपले प्रेम जाहीर केले आहे. त्याने आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त केले आहे आणि तेही भव्य शैलीत. विद्युत जामवालने नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला आहे. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्युत-नंदिता यांचे फोटो व्हायरल


सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यात विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. दोघांनीही ताजमहाल समोर हे फोटो क्लिक केले आहे. फोटोत नंदिता तिच्या अंगठीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. दोघे एकमेकांचा हात धरुन उभे आहेत. दोघांनी  तीन दिवसांपूर्वीच साखरपुडा केल्याचं समजतंय.



नंदिता एक फॅशन डिझाईनर 
नंदिता महतानी एक फॅशन डिझाईनर आहे. नंदिता दिनू मौर्य सोबत प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवते. एवढेच नाही तर ती विराट कोहलीची स्टायलिस्ट देखील आहे. विद्युतच्या आधी नंदिता फक्त तिचा बिझनेस पार्टनर दिनू मौर्यला डेट करत होती. दोघांमध्ये बरेच ब्रेकअप आणि पॅचअप झाले आणि नंतर दोघेही वेगळे झाले. आताही दोघे चांगले मित्र आहेत.  नंदिता आता विद्युत जामवालला डेट करत आहे आणि त्या दोघांचे संबंध काही दिवसांपूर्वी सुरू झाले आणि दोघांच्या साखरपुड्याची बाबही समोर आली आहे.