Vijay Antony's post after Daughter Meera's Death : दाक्षिणात्य अभिनेता आणि संगीतकार विजय एंटनी यांच्या लेकीनं मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केला. विजयच्या लेकीचं नाव मीरा असून ती 16 वर्षांची होती. मीरानं त्यांच्या चेन्नईच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. लेकीच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केल्याच्या एका दिवसानंतर, विजयनं एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेले पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजयनं लिहिलंय की लेकीच्या निधनानंतर मी आतून मेलोय. विजयनं पुढे सांगितलं की मीरा नेहमीच त्याच्यासोबत राहिलं आणि तो जे पण चांगल काम करेल, ते तिच्यासाठी समर्पित करेल. विजयची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे चाहते देखील भावूक झाले आहेत. विजयनं ही पोस्ट तमिळमध्ये केली आहे. विजय म्हणाला, 'तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, माझी लेक मीरा खूप गोड आणि शूर आहे. ती आता जात, धर्म, पैसे, इर्षा, त्रास, गरीबी आणि सूड यापासून मुक्त आणि शांततेच्या ठिकाणी गेली आहे. ती अजूनही माझ्याशी बोलते. तिच्यासोबत माझाही मृत्यू झाला आहे. मी आता तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. यापुढे मी तिच्या वतीनं जे काही चांगलं काम करीन त्याची सुरुवात तिच्याकडूनच होईल.'



विजयच्या लेकीनं 19 सप्टेंबर रोजी तिच्या रुममध्ये आत्महत्या केली. सकाळी जवळपास 3 च्या सुमारास तिला त्या अवस्थेत लगेच विजय तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीरा ही चेन्नईच्या एका प्रायव्हेट शाळेत शिकत होती. ती शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थींपैकी एक होती. त्याशिवाय ती कल्चरल हेड होती. मीरानं अचानक आत्महत्या का केली त्यानं अनेकांना मोठा झटका बसला आहे. तर विजय आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. 


हेही वाचा : ऑस्ट्रेलियात BMW वर 'जय भीम' नंबर प्लेट लावणारा कोण? अभिनेते किरण माने म्हणाले, 'निव्वल टँलेंटच्या बळावर...'


विजय आणि फातिमाची मीरा ही मोठी मुलगी होती. मीराच्या पार्थीवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आलं. तिथल्या स्थानिक मीडिया हाऊस 'थांथी टीवी'नुसार, 'मीराचा अंत्यविधी दरम्यान, तिची आई फातिमा खूप रडत होती आणि बोलत होती की मी तुला माझ्या गर्भात ठेवलं... तू मला एका शब्दानं सांगू शकत नव्हतीस.'