मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता विजयचा आज वाढदिवस आहे. 22 जून 1974 रोजी त्याचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. विजयचा आज वाढदिवस असल्यामुळे  सोशल मीडियाच्य माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होतो. एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबतचं तो एक उत्तम डान्सर आणि गायक आहे. विजयने त्याच्या करियरमध्ये फक्त तामिळ चित्रपटांना प्राधान्य दिलं नाही तर, त्याने इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. आता पर्यंत विजयने 64 चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय साऊथ सिनेसृष्टीतील हाय पेड अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयने 'बिस्ट' चित्रपटासाठी 100 कोटी रूपयांचं मानधन घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार मानधनाच्या यादीत विजयने रजनीकांत यांना देखील मागे टाकलं आहे. 'दरबार' चित्रपटात त्याने 90 कोटी रूपयांचं मानधन स्वीकारलं होतं. महागड्या विजयची लाईफ स्टायल देखील प्रचंड महागडी आहे. 


चेन्नईमध्ये विजयचा भव्य बंगला आहे. त्याच्या बंगल्यामध्ये सर्व सुविधा देखील आहेत. रिपोर्टनुसार विजयकडे 56 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 410 कोटी रूपयांची संपत्ती आहे. चित्रपटाशिवाय तो अनेक जाहिरातींच्या माध्यमातून देखील पैसे कमवतो. रिपोर्टनुसार विजयचं वर्षाचं उत्पन्न 100 ते 120 कोटी रूपयांच्या घरात असतं.