ना अल्लू अर्जुन ना प्रभास; रजनीकांत, शाहरूखचा रेकॉर्ड तोडणार `हा` दाक्षिणात्य सुपरस्टार
Leo Box Office Collection: बॉक्स ऑफिस कलेक्शनचं गणित पहिल्यावर कोणता चित्रपट हीट आणि कोणता फ्लॉप हे कळून येतेच. सध्या चर्चा आहे ती म्हणजे दाक्षिणात्त्य सुपरस्टार विजयची. त्याचा `लिओ` हा चित्रपट रजनीकांतच्या `जेलर` आणि शाहरूख खानच्या `पठाण` या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे.
Leo Box Office Collection: काही दिवसांपुर्वी दाक्षिणात्त्य सुपरस्टार विजय याचा 'लिओ' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी पहिल्याच दिवशी हा चित्रपट नक्की किती कमाई करणार याची चांगलीच चर्चा आहे. सध्या या चित्रपटानं रजनीकांत यांचाही रेकॉर्ड तोडला असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तेव्हा या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगसाठी विजयचे चाहते हे अक्षरक्ष: गर्दी होते. एका थिएटरबाहेर तर तुंबड गर्दी पाहायाला मिळाली होती. तेव्हा त्याचे चाहते हे तिकिट मिळेपर्यंत वाट पाहत होते. त्यामुळे ही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहून आपल्याला त्याच्या क्रेझी फॅन्सचीही प्रचिती येईल. तेव्हा समोर आलेल्या रिपोर्टनुसार आपल्या लक्षात येईल की, लिओची किती क्रेझ आहे. समोर आलेल्या आकाड्यांनुसार या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग हे 1 कोटीच्या घरात होते.
विजय हा दक्षिणेतला सुपरस्टार आहे. या चित्रपटातून अनेक मोठे कलाकारही समोर आले आहेत. यातून अर्जुन, गौतम वासुदेव मेनन, प्रिया आनंद, मिस्स्कीन, मन्नसूर अली खान, मॅन्थू थॉमस आणि सॅण्डी असे अनेक कलाकार आहेत. अनुराग कश्यप याचाही यात कॉमिओ आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्ल्याळम आणि कन्नडामध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा : VIDEO: सारा खानचा Ex-Husband तिसऱ्यांदा करतोय लग्न, गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज
काय म्हणातयत ट्रेड विश्लेषक?
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी सांगितले की, 'पहिल्याच दिवशी हा चित्रपट भारतात 70 कोटी कमावू शकेल आणि जगभरात 100 कोटी कमावेल.' 'बॉक्स ऑफिस इंडिया'नुसार या चित्रपटाची दक्षिणेत कमाई ही 60 कोटी होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या सचनिक एंटरटेनमेंटच्या आकड्यानुसार, खालील अंदाज समोर आले आहे. देशात 80 कोटींच्या वर हा चित्रपट कमाई करू शकतो अशी चर्चा आहे. त्याचसोबत तामिळनाडूमध्ये 32 कोटी, आंधप्रदेश किंवा तेलंगनामध्ये 17 कोटी, कर्नाटकात 14 कोटी आणि केरळमध्ये 12 कोटी अशाप्रकारे त्यांनी कमाई केली आहे. देशात इतकी कमाई केल्यानंतर जगभरात 65 कोटींची आणखी कमाई होण्याची शक्यता आहे. त्यातून जगभरात हा सिनेमा 145 कोटी रूपये कमावू शकतो, असा अंदाज आहे. रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटानं पहिल्यांच दिवशी 44.5 कोटी रूपये कमावले होते. त्यावरून तरी 'लिओ' हा चित्रपट त्याच्याही पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळे हा चित्रपट रजनीकांत यांच्या चित्रपटाला मागे टाकू शकतो अशी दाट शक्यता आहे.