Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा सध्या त्याच्या ‘कालकूट’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्याची ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. त्या दोघांनी काही काळा रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर याविषयी सगळ्यांना सांगितलं. दरम्यान, विजयची आई त्याला सतत कॉल करून हाच प्रश्न विचारते की तो कधी लग्न बंधनात अडकणार आहे. दरवेळी विजय आईला काही ना काही कारण देत या विषयाला टाळाटाळ करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा त्याच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाला, “मी मारवाडी आहे, आमच्या समाजात मुलांचे लग्नाचे वय 16 व्या वर्षीचे केले जाते. त्यामुळे माझ्या बाबतीत लग्नाच्या गोष्टी बऱ्याच आधी सुरू झाल्या आणि संपल्यादेखील, कारण मी लग्नाचे वय ओलांडले आहे. इतकंच नाही तर तेव्हा मी अभिनेता झालो होतो, त्यामुळे कुठे ना कुठे हे प्रेशर कमी होण्याचं एक कारण होतं”.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे आई सतत कॉल करून इतक वय झालं असलं तरी देखील लग्नाबाबत विचारते हे सांगत म्हणाला, “माझी आई अजूनही प्रत्येकवेळी फोन कॉलवर माझ्या लग्नाविषयी विचारते. पण आता मी ते टाळू शकतोय, कारण मी माझ्या आयुष्यात चांगलं काम करत आहे”.


हेही वाचा : कधीही आश्रमवासी होऊ शकते; असं का म्हणते प्राजक्ता माळी! अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत


विजय वर्मानं त्याच्या आणि तमन्नाच्या रिलेशनशिपविषयी एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. विजय म्हणाला होता की तो फक्त तमन्नावर प्रेम करत नाही तर तिच्या प्रेमात वेडा आहे. त्या दोघांची पहिली भेट ही 'लस्ट स्टोरीज 2' च्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विजय आणि तमन्ना यांचा 1 जानेवारी 2023 रोजी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते दोघे नवीन वर्षाचं एकत्र स्वागत करताना दिसले. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओत ते दोघे किस करताना दिसले होते. अशात त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होता. मात्र, त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी अखेर काही दिवसांपूर्वी सगळ्यांसमोर जाहिरपणे त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले. तर विजय लवकरच 'कालकूट' या वेब सीरिजमध्ये पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत श्वेता त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ही सीरिज 27 जुलै रोजी जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.