मुंबई : सध्या फक्त बॉलिवूडमध्ये नाही, तर मराठी सिनेविश्वात देखील लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरनंतर आता मराठी इंडस्ट्रीतील क्यूट जोडी अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या मेहंदी सोहळ्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही फार सुंदर दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांच्या मेहंदीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये शिवानी नवरीच्या रुपात प्रचंड सुरू दिसत आहे. तर दुसरीकडे नवऱ्या मुलाच्या रुपात विराजसचा रुबाब सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शिवानी आणि विराजस 7 मे 2022 ला लग्नगाठ बांधनार आहेत.  या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.  व्हिडीओमध्ये दोघेही फार सुंदर दिसत होते. सर्वातआधी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजसने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शिवानीबद्दल सांगायचं झालं तर, 'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं.  'सांग तू आहेस ना' ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये देखील शिवानीने काम केलं आहे. 


विराजसच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ' डावीकडून चौथी बिल्डिंग' नाटकात शिवानीने देखील अभिनय केला. त्यानंतर त्याने 'होस्टेल डेज' सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे.