या couple मुळे नेहाचं ही मार्केट डाऊन, आवाजाने लावलंय नेटकऱ्यांना वेड
गायिका परंपरा टंडनचे अनेक बॉलिवूड साँग्स रिलीज झाले आहेत. नोरा फतेहीचं `छोर देंगे` हे अल्बम साँग परंपरा टंडनच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेण्ड होत असतं. एखादी गोष्ट नेटकऱ्यांच्या पसंती उतरली की तो फोटो किंवा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो. लॉकडाऊनच्या काळात तर अनेकांनी घर बसल्या आपलं टॅलेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्यातीलच एक सिंगर कपलला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. संचित आणि परंपरा असं या viral couple कपलचं नाव आहे. दोघेही प्रोफेशन सिंगर आहेत.
या कपलचे गाण्याचे व्हिडिओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. गायिका परंपरा टंडनचे अनेक बॉलिवूड साँग्स रिलीज झाले आहेत. नोरा फतेहीचं 'छोर देंगे' हे अल्बम साँग परंपरा टंडनच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
संचित आणि परंपरा यांनी एकत्र पोस्ट केलेला शिव तांडवचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी शेअर केलेल्या इतर व्हिडिओंना देखील नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत गेली. परंपरा आणि संचित सोशल मीडियावरील सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या viral couple पैकी एक आहे.
संचित आणि परंपरा यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. या कपलने सध्या सगळ्यांनाच आपल्या गोड आवाजाने वेड लावलं आहे.