नवी दिल्ली : २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा वरुण धवनचा 'जुडवा-२' हा चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आतापर्यँत या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या सगळी गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. परंतु, 'चलती है क्या ९ से १२' या गाण्याने प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली. ज्यात वरुण आणि जॅकलिनचा जबरदस्त डान्स पाहायला मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये इतकी आहे की, या गाण्याच्या डान्स स्टेप्सवर स्वतःचे डान्स व्हिडिओज बनवून अनेकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. 


 



आजकाल इंटरनेटवर असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो Melvin Louis या यु-ट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. यात एका मुला-मुलीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळतो. फक्त ४ दिवसात हा व्हिडिओ १७ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक कंमेंट्स देखील मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ३ सप्टेंबरला अपलोड करण्यात आला होता.