मुंबई : 'राम-लीला' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी इटलीतील लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली. कोंकणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. दीप-वीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो अद्यापही अधिकृतपणे पोस्ट करण्यात आलेले नसले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग ते लेक कोमो परिसरात सजलेलं विवाहस्थळ असो किंवा आणखी काही. 'दीप-वीर'च्या लग्नाशी संबंधित प्रत्येक फोटो आता अनेकांसाठीच महत्त्वाचा ठरत आहे. अशाच व्हायरल फोटोंच्या गर्दीत बी- टाऊनचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंगचा फोटोही प्रकाशझोतात आला आहे. 


हा फोटो लग्नसोहळ्यातीलच असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तो आणखी खास ठरतोय. 


'फिल्मफेअर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीरने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याने डिझाईन केलेली शेरवानी घातलेली होती. पांढऱ्या रंगाच्या शेरवानीवर सोनेरी रंगाची कलाकुसर पाहता हा लूक त्याला अगदी शोभून दिसत होता. 


रणवीरच्या लूकमध्ये चार चाँद लावत होता तो म्हणजे 'संग्राम भालेराव'चा टच. 'सिम्बा' या चित्रपटातीलच लूक रणवीरने लग्नाच्या दिवशीही कायम ठेवला असून त्यामुळे नवरदेवाच्या रुपातही तो अगदी सुरेख दिसत आहे. 



रणवीरच्या लूकचा हा धुसर फोटो व्हायरल होत असला तरीही आता अनेकांचच लक्ष दीपिकासोबतच्या त्याच्या लग्नाच्या फोटोंकडेच लागून राहिलं आहे. त्यामुळे आता ही उत्सुकता 'दीप-वीर' कुठवर ताणून धरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.