मुंबई : विकी कौशल नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या सक्सेसचं सेलिब्रेशन करत आहे. चित्रपटाचं स्क्रीनिंग 14 ऑक्टोबर रोजी झालं आणि त्यात कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि इतर काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र कतरिना कैफनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. स्क्रीनिंगमध्ये कतरिनाला तिचा कथित बॉयफ्रेंड विक्की कौशलला सपोर्ट करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्क्रिनींग दरम्यानचे दोन्ही कलाकारांचे बरेच फोटोही बाहेर आले, मात्र ते एकामध्येही एकत्र दिसले नाहीत. यामुळे दोन्ही स्टार्सचे चाहते निराश झाले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे, रूमर्ड कपलचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. त्यांचा हा रोमँन्टिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


अनेक चाहते व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हार्ट इमोजी शेअर करून कपलवरील प्रेम व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी या कपलच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असल्याचे वर्णन केलं आहे. यावेळी अभिनेत्रीने डेनिम स्कर्टसोबत स्वेटशर्ट घातला होता. दोघांनी लेदर बूट घातले होते. विकी पांढऱ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला होता. शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. कतरिना त्या लोकांपैकी एक होती ज्यांनी चित्रपटावर आपलं मत मांडत विकीचं कौतुक केलं. कतरिनाने इंस्टाग्रमावर पोस्ट शेअर करत सिनेमाचं आणि विकीचं कौतुक केलं आहे.



कतरिनाने पोस्टमध्ये लिहिलं की, 'शुजित सरकार काय नजराणा आहे, इतका मनोरंजक सुंदर चित्रपट, सुंदर कथा. विक्की कौशल एक प्युअर टॅलेंट आहे.' याचबरोबर तिने लोकांना चित्रपट पाहण्याचा सल्लाही दिला आहे. विकीने तिच्या स्तुतीची दखल घेतली आणि कतरिनाची पोस्ट शेअर केली आणि तिचे आभार मानले. विकी आणि कतरिनाने अद्याप डेटिंग करत असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांच्या साखरपुडा झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र विकीने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं.