मुंबई : टीव्ही कलाकार सनाया इरानी आणि तिचा पती मोहित सहगल सध्या सोशल मीडियावर भलतेच चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाला २५ जानेवारीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांनी एकमेकांचा घेतलेला लिप लॉक किसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनायाच्या पतीने सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो त्यांच्या चाहत्यांना भलताच आवडला असून, अनेकांनी तो शेअर केला आहे. तर, काहींनी लाई केला आहे. ज्यांना व्यक्त व्हावे वाटले अशा चाहत्यांनी त्यांच्या फोटो खाली एक कमेंटही लिहीली आहे. 


सहगलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोखाली एक कॅप्शनही लिहीली आहे. त्याने म्हटले आहे की, तुझ्यापेक्षा चांगला पार्टनर मला माझ्या आयुष्यात दुसरा मिळू शकत नाही. तुझ्यासोबत म्हातारपण घालवने हे माझ्यासाठी एक स्वप्न असेन. माझी ताकत बनून माझ्यासोबत राहिल्याबद्धल आभार. हॅप्पी अॅनिवर्सरी माय लव्ह.


दरम्यान, सनायानेही पतीबद्दल एक छान व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात लिहिले आहे 'मेरा प्यार और मेरी जिंदगी से भी बढ़कर होने के लिए शुक्रिया. सनाया आणि मोहितने २५ जानेवारी २०१६ ला ७ वर्षांच्या डेटींगनंतर लग्न केले होते.