भर स्टेडियममध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्याचा `दोस्ताना`?
त्यानं रणवीरला घट्ट मिठी मारली आणि...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) हा त्याच्या अभिनयासोबतच इतर कारणांनीसुद्धा चर्चेत असतो. किंबहुना ही इतर कारणं अनेकदा त्याला अधिक प्रकाशझोतात आणतात. सध्या बॉलिवूडचा हा फॅशन आयकॉन चर्चेत आलाय ते म्हणजे एका व्हिडीओमुळं.
सोशल मीडियावर व्हारल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये रणवीर अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor ) याच्यासोबत नेमकं काय करतोय हेच अनेकांना कळेनासं झालं आहे. सहसा ही सेलिब्रिटी मंडळी एकत्र येऊन फुटबॉल खेळताना पाहायला मिळतात. यावेळीसुद्धा असंच काहीसं झालं. जिथं स्टेडियममध्ये रणवीर बेंचवर झोपलेला असतानाच, तिथे अर्जुन आला आणि त्यानं रणवीरला घट्ट मिठी मारली. बराच वेळ या दोन्ही अभिनेत्यांमध्ये मिठी मारली गेली, पुढं मात्र दोघांचेही चेहरे झाकले गेले.
आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांनी तर, अर्जुन आणि रणवीर किस करत असल्याचंही म्हटलं. आता त्यांनी नेमकं काय केलं हे तेच जाणतात. पण, सोशल मीडियावर या व्हिडीओनं कमालीचा धुमाकूळ घातला असून, हा दोस्ताना बऱ्याच चर्चांना वाव देणारा ठरत आहे. विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट करत या दोन्ही अभिनेत्रांची खिल्ली उडवली आहे.
'गुंडे'मध्ये दिसलेले एकत्र
रणवीर आणि अर्जुन 'गुंडे' या चित्रपटातून एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्तानं या दोन्ही अभिनेत्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी या जोडीला कमालीची पसंती दिली होती. ऑफस्क्रीनही या जोडीच्या मैत्रीचे अनेक किस्से आणि व्हिडीओ तितक्याच प्रसिद्ध आहेत. पण, ही त्यांची स्टेडियम केमिस्ट्री, मात्र वर्तुळापलीकडल्या चर्चा रंगवतेय हेही खरं.