VIRAL VIDEO BEFORE SONALI PHOGAT DEATH: काही दिवसांपूर्वीच टिकटॉक स्टार ,बिग बॉसची स्पर्धक अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (SONALI PHOGAT)यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. सोनाली यांचा  मृत्यू बरेच प्रश्न उपस्थित करुन गेला. सोनालीचा मृत्यू हा नॅचरल नसून यामागे काहीतरी दुसरं कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे तशी तक्रारसुद्धा गोवा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यादिवशी मुत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल  झाला आहे या व्हिडीओ मध्ये सोनाली फोगट त्यांचा PA Sudhir Sangwan आणि Sukhwinder Sangwan सोबत डान्स करताना दिसत आहे .हा व्हिडीओ मृत्यूच्या आधल्या दिवशीचा असल्याचा  सांगितलं जात आहे.  



सोनाली यांचा भाऊ, रिंकू ढाकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बहाण्यानं गोव्यात आणलं गेलं. पण, इथं कोणतंही चित्रीकरण होणार नव्हतं. कुटुंबाला हे चित्रीकरण 24 ऑगस्टला होणार होतं, पण हॉटेल मात्र 21-22 ऑगस्टसाठीच बुक करण्यात आल्याची माहिती असल्याचंही त्यानं दिली. (actress tunred bjp leader Sonali phogat death controversy details big news)


हेही वाचा: SHOCKING ! रेखा 'हे' काम करून करताहेत स्वतःचा उदरनिर्वाह..झाला खळबळजनक खुलासा


'गोव्यात येण्याचा तिचा कोणताच बेत नव्हता. पूर्वनियोजीत आराखड्यानुसार तिला इथं आणलं गेलं. तिथं कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण होणार नव्हतं. हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी फक्त दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या', असं रिंकूनं सांगितलं. 


टिकटॉक स्टार (Tiktok Star) आणि भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगाट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे.