मुंबई : बॉलिवूडची टॅलेंटेड गायिका नेहा कक्कड पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आलीय. गाणं आणि त्यावर थिरकणं यात तर सुंदर नेहाचा हातखंडा... त्यातच ती सोशल मीडियावर अनेक प्रयोग करत असते... आपल्या फॅन्ससोबत ती वेगवेगळे व्हिडिओही शेअर करत असते. काही वेळापूर्वीच नेहानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टिक-टॉक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये नेहा डान्स करताना दिसतेय. नेहाचा हा व्हिडिओ अवघ्या काही तासांत १२ लाखहून अधिक वेळा पाहिला गेलाय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा कक्कडच्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिचा भाऊ टोनी कक्कडनं लिहिलंय, 'नेहा तू कॅमेऱ्यावर किती गोड दिसतेस आणि तू खूप फ्रेंडलीही आहेस... आता माझं गाणं नक्कीच हीट होणार'.



नेहा कक्कड हिला टोनी कक्कड आणि सोनू कक्कड हे दोन भाऊ आहेत. टोनीच्या गाण्यांना बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळतोय. अंखियां, कार में म्युझिक बजा आणि लोरी सुना या गाण्यांसाठीही टोनीनं याआधी काम केलंय. परंतु, त्याचं 'कोका कोला' हे गाणं त्याचं फॅन फॉलोईंग अधिक वाढलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टोनीचं 'कोका कोला तू' हे गाणं 'लुका छिपी' या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कृति सेनन यांच्यावर रीक्रिएट करण्यात आलंय.