मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'मणिकर्णिका' या आगामी चित्रपटामधून अंकिता लोखंडे हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणावतसोबतच वैभव तत्त्ववादी हा मराठमोळा चेहरादेखील झळकणार आहे. मात्र 'मणिकर्णिका' हा चित्रपट रीलिज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.  


मासिकासाठी फोटोशुट  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता लोखंडेने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या फोटोशूटमध्ये अंकिताने चंदेरी रंगाची साडी नेसली आहे.  
फोटोशूट दरम्यानही अंकिता धम्मालमस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक जण अंकिताला प्रश्न करतो, " तू ऑस्करसाठी तयारी करत आहेस का ?"


अंकिताला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पहा काय दिलंय अंकिताने उत्तर 


 



 


 



अंकिता लोखंडे आणि कंगना एकत्र  


मणिकर्णिका हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या म्हणजेच प्रमुख भूमिकेत कंगणा रणावत झळकणार आहे. 
अंकिता लोखंडे झलकारी बाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई ही राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवर्तींयांपैकी एक होत्या. त्या राणी लक्ष्मीबाईंसारख्या दिसत होत्या. या चित्रपटासाठी अंकिताने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचेही शिक्षण घेतले.