Rahat Fateh Ali Khan Viral Video: पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येते. ट्विटरवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात व्हिडिओत गायक त्यांच्याच नोकराला चपलेने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की या व्हिडिओतील व्यक्ती ही राहत फतेह अली खान आहेत. या व्हिडिओ व्हायरल होतांचा त्यांच्या चाहत्यांचा मोठा धक्का बसला आहे. तसंच, पाकिस्तानातील नागरिकही यावरुन गायकावर कडाडून टीका करत आहेत. या व्हिडिओमुळं एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडिओमध्ये असलेला व्यक्ती हा गायक राहत फतेह अली खान असल्याचा दावा करण्यात येत आहे.यात ही व्यक्ती नोकराचे केस पकडून आणि त्यानंतर हातात चप्पल घेऊन त्याच्या डोक्यावर जोरजोरात मारत असल्याचे दिसत आहे. तर, घाबरून नोकर दूर दूर जातोय. नंतर ते त्याच्याजवळ जातात आणि विचारतात की माझी दारूची बॉटल कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नावर नोकर शांत राहतो. त्यावर ते पुन्हा एकदा त्याचे केस पकडून मारहाण करण्यास सुरुवात करतात. 


नोकराला मारत असताना ते सुद्धा अडखळून खाली पडतात. तेव्हा आजूबाजूला असलेले इतर लोक त्यांना पुन्हा उभं करण्यास मदत करतात. मात्र, त्यानंतरही ते नोकराला मारहाण करण्यास सुरुच ठेवतात. नोकराला प्रश्न विचारतच ते दरवाजाजवळ घेऊन येतात आणि पुन्हा एकदा मारहाण करण्यास सुरुवात करतात. या सगळ्या प्रकारानंतर नोकर शांतच असतो. तो एकाही शब्दाने काही बोलत नाहीये. 



सोशल मीडियावर वेगाने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहत फतेह अली खान यांनीदेखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते त्याच नोकराजवळ उभे असतात. नंतर ते नोकराची माफी मागताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान सगळ्यात पहिले त्यांच्या नोकराची माफी मागताना दिसत आहेत. नंतर त्यांनी पुढे म्हटलं आहे की, एक उस्ताद आणि शागिर्द यांच्यातील ही खासगी बाब आहे. माझ्यासोबत माझा मुलगाच उभा आहे. तो शागिर्द आहे. एक उस्ताद आणि शार्गिद यांचे नातेच असे असते. तिथे शागिर्द चांगलं काम करतो तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक केले जाते आणि जेव्हा तो चुका करतो तेव्हा त्याला ओरडा मिळतो. 



व्हिडिओत पुढे नोकर बोलताना दिसत आहे, त्यांनी म्हटलं आहे ती, व्हिडिओत ज्या बॉटलबद्दल बोलणं सुरू होते ती पवित्र पाण्याची बॉटल होती. मी ती बॉटल कुठे ठेवली ते मी विसरलो होतो. हे माझे उस्ताद आहेत आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ज्या प्रकारे लोक व्हिडिओ पाहून समज करुन घेत आहेत. तसं काहीच नाहीये. आमच्या उस्तादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. कित्येक वर्षांपासून मी त्यांच्यासोबत आहे. राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या नोकराची माफी मागितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, त्यावर नोकराने म्हटलं आहे की, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. माझ्यामनात त्यांच्यासाठी फक्त प्रेम आहे.