Viral Videoतून थेट अजय-अतुलकडे..गावाकडच्या पठ्याला मिळाली सिनेमात गायची संधी
व्हिडीओ तुफान वायरल झालं आणि पाहता पाहता हा मुलगा इतका फेमस झाला कि थेट ग्रेट संगीतकार अजय अतुलने...
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ तुफान व्हायरल तुफान व्हायरल झाला होता. गावाकडील शाळेतील एक विद्यार्थी चंद्रा ' हे मराठी गाणं इतक्या भारी गायलंय कि
त्याला तोडच नाही. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ तुफान वायरल झालं आणि पाहता पाहता हा मुलगा इतका फेमस झाला कि थेट ग्रेट संगीतकार
अजय अतुलने(AJAY ATUL) त्याची दाखल घेतली आणि या टॅलेंटेड मुलाला चक्क सिनेमात गाण्याची ऑफर दिली ..
आणखी वाचा:viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा
दिग्दर्शक केदार शिंदे(KEDAR SHINDE) लवकरच शाहीर साबळे(SHAHIR SABALE) यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा घेऊन येत आहेत याच सिनेमात एक गाणं गायची संधी त्याला देण्यात आली. तेही थेट अजय अतुलसोबत..
याबाबतीत खुद्द केदार शिंदेनी पोस्ट करून माहिती दिलीये 'अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो... महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड(SONG RECORDING) होतं... इतिहास असाच लिहिला जातो.
आणखी वाचा: Bipasha Basuसोबत ऐन डोहाळे जेवणात असं काय घडलं?..अचानक रडू लागली आणि..
महाराष्ट्र शाहीर... २८ एप्रिल २०२३...'' असं त्यांनी आपल्या फेसबुक (FACEBOOK POST)पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
ते म्हणतात ना प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण असतात. ग्रामीण भागात (Rural India) देखील अनेक गुणवंत विद्यार्थी (Student) सोशल मीडियाच्या(Social Media) माध्यमातून जगासमोर आले आहे. अशातच सध्या एका शाळकरी मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. व्हायरल व्हीडिओत (Viral Video) हा विद्यार्थी प्रसिद्ध अशी 'चंद्रा' लावणी (Chandramukhi Lavani Dance) आपल्या मधूर आवाजात म्हणताना दिसतोय
हा व्हीडिओ कृष्णा राठोड यांनी (Krushna Rathod) फेसबूकवर शेअर केलाय. (viral video school student chandramukhi lavani sing song teacher krushna rathod share video on facebook)
जयेश खरे या विद्यार्थ्यांने प्रसिद्ध चंद्रा ही लावणी आपल्या सुरेख आवाजात गायली आहे. जयेश हा विद्यार्थी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील
करजगावच्या विद्यालयात शिकतो. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या जयेशच्या कलागुणांचा हा व्हीडीओ त्याचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी समोर आणला. व्हायरल
झालेल्या या व्हीडीओमधून कौशल्य, आवाजात गोडवा आणि अप्रतिम चढउतारचं कौशल्य दिसून येतंय.