मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस' (Bigg Boss) आणि त्यामध्ये सहभागी होणारे सेलिब्रिटी स्पर्धक यांच्याबाबतच्या चर्चा कायम सुरुच असतात. तिथे कार्यक्रमात होणारे डावपेच आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडी यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची नावं कायम प्रकाशझोतात असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात चर्चा होण्याची कारणं मात्र वेगवेगळी असतात. सध्या या रिअॅलिटी शोमुळंच प्रसिद्धीझोतात आलेली एक अभिनेत्री अडचणीत सापडल्याचं म्हटलं जात आहे. ही अभिनेत्री आहे, मीरा मिथुन (Meera Mithun). 


वादग्रस्त वक्यव्यामुळं अडचणी... 
तामिळनाडू पोलीसांच्या सायबर विभागानं हल्लीच मॉडेल आणि अभिनेत्री मीरा मिथुन (Meera Mithun) हिला ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये अनुसूचित जातींबाबत आक्षेपार्ह शब्दाचा वापर करणं तिच्या अंगलट आलं आहे. IANS या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार Viduthalai Chiruthagai Katchi यांनी एफायआर दाखल केल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. 


सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार मीराच्या विरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत Scheduled Caste and Scheduled Tribe अॅक्टमधील 7 कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शकांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. 



'बिग बॉस'मध्ये झळकलेल्या मीरानं Agni Siragugal, 8 Thottakkal आणि Graghanam यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.